बोदवड तालुक्यातील पाणीपुरवठाचा प्रश्न तातडीने मार्गी लावा; आ. चंद्रकांत पाटील यांची मागणी

मुक्ताईनगर/बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  बोदवड तालुक्यातील ५१ गावात पाणीपुरवठा नियमीत होत नाही. वीस-वीस दिवस पाणी पुरवठा नसल्याने बोदवड तालुक्यातील नागरीकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ४८ गावांना रोटेशन पद्धतीने पाणी देत असताना अनेक त्रुटींमुळे बोदवडवासिया हे बारमाही  पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या तांत्रिक बाबी तातडीने दुर करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली.

बोदवड तालुक्यातील (जि. जळगांव) गावांना पाणी पुरवठा करणारी ५१ गावे पाणीपुरवठा योजना ही सन १९९५ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत प्रादेशिक पाणीपुरवठा योजना नावाने कार्यान्वित असणे, त्यावेळी या योजनेत प्रती माणसी ५५ ते ७० लि. पाणी देण्याची तरतूद करण्यात येणे, यानंतर १ जानेवारी, २०१८ ला सदरील योजना पुनर्जिवित होऊन कार्यारंभ आदेश देण्यात येणे, परंतु या योजनेत भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा कुठलाही सारासार विचार न करता उलटपक्षी प्रती माणसी देण्याचे प्रमाण करुन प्रति माणसी ४० लि. पाणी देण्याची तरतूद करण्यात येणे, तसेच पाणी पुरवठा यांत्रिकी विभागात देखील अनेक त्रुटी आणि अडचणी ठेवूनही ही योजना तयार करतांना दिसून येणे, केवळ कागदावर निर्माण झालेली ही अपूर्ण योजना आज रोजी बोदवड वासियांची तहान भागविण्यास अपयशी ठरलेली असणे, ही योजना नव्याने करणे अपेक्षित असतांना सदरील योजना पुनर्जिवित करुन योजनेची तत्कालिन जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाणी घेऊन जाणारी पाईप लाईनची क्षमतादेखील कमी करुन भविष्यातील लोकसंख्येचा विचार न करता आणि इतर असंख्य त्रुटी व अडचणी याचा सारासार विचार संबंधित विभागाने तोडक्या स्वरुपाची योजना तयार करुन कंत्राटदारांच्या घशात घालण्याच्या हेतूने त्रुटी कायम ठेवून योजना पुनर्जिवित करणे, ही योजना पुनर्जिवित करुन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पूर्ण करुन ५ वर्षे उलटूनही जि.प. ग्रामीण पुरवठा विभागाकडे हस्तांतरीत करण्यात न येणे, तसेच आजतागायत ही योजना सक्षमरित्या कार्यान्वित नसल्याने आज रोजी बोदवड तालुका हा तहानलेला असल्याने ग्रामस्थांमध्ये निर्माण झालेले असंतोषाचे व संतापाचे वातावरण, याकरिता सदरील योजनेसंदर्भात तातडीने नव्याने योजना करुन बोदवड तालुकावासियांना शुध्द व मुबलक पाणी पुरवठा करण्याची आवश्यकता, याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना करणार आहात का ?

५१ गाव पाणीपुरवठा योजनेचा उद्भव पूर्णा नदी वरून असल्याने पूर्णा नदी पात्रात प्रचंड गाळ वाहून येत असतो तसेच या पात्रात शहराचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते त्यामुळे हे पाणी फिल्टर होण्यासाठी बराच अवधी लागत असल्याने तसेच पंप जळत असल्याने अनेक गावांचा पाणीपुरवठा तांत्रिक अडचणीमुळे २०-२० दिवस खोळंबतो . असे सांगत त्यांनी यातील त्रुटीही समोर आणल्या आधी 150 हार्स पावर क्षमतेचे तीन पंप होते आता 125 हॉर्स पॉवर क्षमतेचे केवळ दोन पंप आहेत. पाण्याची साठवण क्षमता 50 लाख लिटर आवश्यक असताना केवळ दोन लाख लिटर साठवण क्षमता आहे. 48 गावांना रोटेशन पद्धतीने पाणी देत असताना वरील अनेक त्रुटींमुळे बोदवड वासिया हे बारमाही  पाणीटंचाईला सामोरे जात असतात. त्यामुळे ही योजना वाढीव करणार आहात का बोदवड वासियांना दररोज पाणी देणार आहात का याबाबत आपण संवेदनशील आहात का अशी लक्षवेधी मांडत आ.चंद्रकांत पाटील विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली.

 

लक्षवेधीवर उत्तर देताना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी सांगितले की ,आमदारांनी मांडलेले प्रश्न खरे असून त्यांनी मागणी केल्यानुसार नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी उपाय योजना करणे संदर्भात दिनांक ४ जुलै रोजी आमदार व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडलेली आहे तरी तात्काळ या संदर्भात उपाययोजना करण्यात येतील असे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी लक्षवेधीवर उत्तर देताना आश्वासित केले.

 

Protected Content