बिहार भाजप मुख्यालयातील २४ जणांना कोरोनाचा संसर्ग !

पटना (वृत्तसंस्था) बिहार भाजप मुख्यालयातील २४ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. बिहार भाजप प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

 

 

बिहार भाजपच्या पाटना येथील मुख्यालयात वावरणाऱ्यांपैकी ११० जणांचे नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी २४ जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यात भाजपचे संघटन मंत्री नागेंद्र जी, प्रदेशाध्यक्ष दिनेश कुमार, उपप्रदेशाध्यक्ष राजेश वर्मा, राधा मोहन शर्मा, यांच्यासह भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

Protected Content