सचिन पायलटांची समर्थक आमदारांसह बैठकीला पुन्हा दांडी !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आज पुन्हा एकदा जयपूरमध्ये काँग्रेस आमदारांची बैठक होत आहे. परंतू या बैठकीला सचिन पायलट आणि त्यांच्या गटातील आमदारांनी हजर राहणे टाळल्यामुळे गहलोत सरकारच्या स्थिरतेलाच धोका निर्माण झाला आहे.

 

राजस्थानमध्ये काँग्रेसमधील नाराजीनाट्य आणि राजकीय संकट सुरुच आहे. बंडखोरी करत दिल्लीत आलेल्या सचिन पायलट यांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही आमदारांची बैठक घेत शक्तीप्रदर्शन केले आहे. परंतू व्हिप काढूनही सचिन पायलट आणि त्यांच्या गटातील आमदार गैरहजर राहिल्याने काँग्रेसकडून या सर्वांना नोटीस पाठवली जाण्याची शक्यता आहे. ‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार आता जयपूरच्या फेअरमाँट हॉटेलमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक सुरु आहे. या बैठकीला १०२ आमदार उपस्थित असून त्यांनी सचिन पायलट यांना पक्षातून काढण्याची मागणी केली आहे.

Protected Content