चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पिलखोड येथील इयत्ता चौथीत शिकत असलेली श्रद्धा पाटील या मुलीच्या डोळ्यातून (दि.4 जुलै) पासून ते आजपर्यंत चनादाळ आकाराएवढे 20 ते 21 खडे पडल्याची घटना घडल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, श्रद्धा ही त्यांचे शेजारी राहणारे मुन्ना गोसावी यांच्या घरी खेळत होती. तेव्हा तीन ते चार खडे डोळ्यातून पडले. गोसावी यांनी मुलीच्या आई वडिलांना सांगितले, त्यांचा विश्वास बसत नव्हता. पाटील दापंत्य यांनी चाळीसगावी जाऊन तपासणी केल्यानंतर पुन्हा खडे पडले. नेत्ररोग तज्ञ डॉ. अमित महाजन व डॉ. अमित महाजन यांनी श्रद्धा या मुलीच्या डोळ्यांची तपासणी करून इन्फेक्शन झाले असल्याचे सांगितले असून तिला डोळ्याचा ड्रॉप देण्यात आला असल्याची माहिती डॉ. महाजन यांनी दिली आहे.
याचबरोबर, श्रध्दाच्या वडीलांनी तिला पिलखोडा येथील डॉ. चंद्रकांत पाटील यांच्याकडे घेऊन गेले त्यावेळी डॉ.पाटिल यांनी तपासणी करुन श्रध्दाचा डोळा दाबला तर डोळयातून चक्कय खडा बाहेर पडला. अशी माहिती डॉ. पाटील यांनी दिली आहे.