चाळीसगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील वृंदावन कॉलनी परिसरात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ६७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सोमवारी १६ मार्च रोजी दुपारी १ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुनंदा श्रीराम कुमावत (वय ६३, रा. वृंदावन कॉलनी) या सेवानिवृत्त शिक्षिका आहेत. १५ मार्चच्या मध्यरात्री १२ ते १६ मार्च रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास ही चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटात सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ७६ हजारांचा ऐवज लंपास केला. केवळ दागिने आणि रोकडच नव्हे, तर चोरट्यांनी घरातील महत्त्वाची कागदपत्रे, बँक पासबुक, एटीएम कार्ड आणि पॅनकार्डवरही डल्ला मारला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल नितीन आगवणे हे करीत आहे.




