वरणगाव प्रतिनिधी | आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर काल सोलापूर येथे काही समाजकंटकांनी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्राणघातक हल्ला झाला असून या भ्याड हल्ल्याचा वरणगावात निषेध करण्यात आला आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला निवेदन देखील देण्यात आले आहे.
या गोष्टीमुळे धनगर समाजात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आमदार गोपीचंद पडळकर साहेब प्राणघातक हल्ला घडवून आणण्यात आला आमदार गोपीचंद पडळकर हे
घोंगडी बैठका आटपून परतताना गाडीवर हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला तरी हल्लेखोरा वर पोलीस प्रशासनाने ताब्यात घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी वरणगाव धनगर समाजातर्फे वरणगाव पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले याप्रसंगी वरणगाव धनगर समाज अध्यक्ष शामराव धनगर वरणगाव मल्हार सेना अध्यक्ष सुखदेव रामदास धनगर धनगर समाज सचिव विकास बोरसे सर मल्हार सेना सचिव पप्पू गोकुळ ठाकरे सुनील धनगर गजानन संतोष वाघ सुभाष गंगाराम धनगर व सर्व धनगर समाज बांधव उपस्थित होते.