आधारवड सामाजिक उपक्रमाची वर्षपूर्ती ! ( व्हिडीओ )

पाचोरा (प्रतिनिधी) शहरामध्ये मागील वर्षी १ एप्रिल २०१८ रोजी शहरातील काही युवकांनी मिळून राजे संभाजी युवा फाऊंडेशन संचलित आधारवड म्हणून एक सामाजिक उपक्रम सुरु केला होता. या उपक्रमाला आज एक वर्ष पूर्ण झालेय.आधारवड उपक्रमाअंतर्गत दररोज किमान शंभर गरीब,निराधार लोकांना जेवण दिले जात असते. शहरातील व्यावसायिक प्रविण पाटील,भूषण देशमुख,राहूल पाटील,रवी देवरे यांनी यांच्या संकल्पनेतून आधारवड उपक्रम सुरु झाला आहे.

 

राजे संभाजी युवा फाऊंडेशन अंतर्गत आधारवडमध्ये सुरुवाल दररोज ५० ते ६० लोकांचे जेवण बनविण्यात येत होते. आता प्रत्येक दिवशी १०० लोकांचे जेवण आधारवड येथे बनविण्यात येते. यासाठी दररोज लागणारा खर्च कुठलीही वर्गणी न करता स्वतःच्या खिशातून करण्यात येतो. आधारवडमध्ये अशा लोकांना जेवण दिले जाते की, ज्यांना कोणीही वाली नाही. त्यात भिकारी,वयोवृद्ध आजी,बाबा,काकू,वेडसर,गतिमंद त्याच बरोबर पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील ऍडमिट झालेल्या रुग्णांसाठी देखील ही सेवा देण्यात येते.

 

हळू हळू पाचोरा शहरातील व्यावसायिक,व्यापारी,कर्मचारी,अधिकारी,युवा कार्यकर्त्यांनी आधारवडकडे लक्ष केंद्रित झाले आहे. समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो म्हणून आपल्या वाढदिवसाला कुठेही खर्च न करता आधारवडमार्फत गरीब लोकांना जेऊ घालण्यासाठी अनेक जण पुढे आले आहेत. तालुक्यातील जवळपास सर्वच परिसरातील मान्यवर,कार्यकर्ते,अधिकारी यांचे वाढदिवस आधारवड येथे साजरे केले जातात. बघता-बघता आधारवडमध्ये आज एकाच वर्षात वाढदिवसाच्या तारखा आगाऊमध्ये आधारवडकडे बुकिंग केल्या जातात. आधारवर या सामाजिक उपक्रमामध्ये लक्षण पाटील,गजु गुडेकर,सचिन सदनशिव,गणेश सोनार,गभिर सर, बबलू पाटील,महेंद्र अग्रवाल यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

 

यावेळी पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल शिंदे याच बरोबर पत्रकार संदीप महाजन,युवा नेते अमोल शिंदे, नगरसेवक संजय नाना वाघ, संजय एरंडे, पत्रकार प्राध्यापक सी.एन. चौधरी,प्रशांत येवले, योगेश पाटील, संजय पाटील,गर्जा महाराष्ट्र न्यूज समूहाचे राहुल महाजन वीर मराठा मावळा संघटनेचे जिल्हाकार्याध्यक्ष गणेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Add Comment

Protected Content