Home Cities धरणगाव श्री संत सावता माळी युवक संघाचा पदनियुक्ती आणि सत्कार सोहळा

श्री संत सावता माळी युवक संघाचा पदनियुक्ती आणि सत्कार सोहळा

0
43

धरणगाव,प्रतिनिधी । श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड, प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन, प्रदेश प्रवक्ता अजिंक्य फुले तसेच कार्याध्यक्ष कैलास शिंदे खान्देश विभागीय अध्यक्ष संजीवकुमार खान्देश विभागीय उपाध्यक्ष लक्ष्मण माळी तसेच विनायक शिवदास माळी मार्गदर्शनाखाली निवड झाली.

माळी समाजातील निलेश रावा महाजन यांची धरणगाव तालुका अध्यक्षपदी तसेच अमोल गोकुळ पाटील यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. चेतन सदाशिव पाटील तालुका संपर्क प्रमुखपदी तसेच दुर्गेश विजय माळी यांची तालुका कार्य अध्यक्षपदी तसेच नरेश साईनाथ पाटील तालुका संघटकपदी तसेच दिनेश यशवंत महाजन शहाराअध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री संत सावता माळी युवक संघाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी खान्देश विभागीय उपाध्यक्ष लक्ष्मण माळी, जिल्हा संपर्क प्रमुख महेंद्र महाजन, तालुका संपर्क प्रमुख समाधान माळी चोपडा, तालुका उपाध्यक्ष अल्केश माळी, रोहित माळी समस्त युवक संघटने पदाधिकारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound