अहुजानगरजवळील महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । जळगाव-धुळे महामार्गावरील आहुजानगर स्टॉपजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाला. रविवारी पहाटे ४.४५ वाजता ही घटना उघडकीस आली. दरम्यान, अनेक वाहनचालक हा मृतदेह पाहुन न थांबता निघुन गेले. दैनिकातील कर्मचाऱ्याच्या मदतीने संदर्भात जळगाव तालुका ठाण्यातील पोलिसांना माहिती दिली. यांनतर मृतदेह उचलण्यात आला.

या मृताची ओळख पटलेली नाही. मध्यरात्री अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे या प्रौढाचा मृत्यू झाल्याचे दिसून येते आहे. त्याचा मृतदेह अत्यंत छिन्न-विछिन्न अवस्थेत महामार्गाच्या मधोमध पडून होता. पहाटे ४.४५ वाजता एका दैनिकाच्या वृत्तपत्राच्या छपाई विभागाचे कर्मचारी अभिजीत चांदगुडे, अविनाश महाजन, रिजवानखान याकुबखान व हरींदर राणा हे काम आटोपुन चारचाकीने शहराकडे येत होत. यावेळी त्यांना रस्त्याच्या मधोमध मृतदेह पडलेला आढळून आला. दरम्यान, यावेळी अनेक वाहनचालक मृतदेह पाहुन निघुन जात होते. पत्रकारांनी कर्मचाऱ्यांनी थेट तालुका पोलिस ठाण्यात येऊन संबधित माहिती पोलिसांना दिली. यानंतर पंचनामा करुन सकाळी ६.१५ वाजता हा मृतदेह घटनास्थळावरुन उचलुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. या प्रकरणी अभिजीत चांदगुडे यांनी दिलेल्या खबरीवरुन तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस नाईक प्रितम पाटील तपास करीत आहेत. दरम्यान, मयत प्रौढाची ओळख पटविण्याचे आवाहन जळगाव तालुका पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Protected Content