सामाजिक संघटनातर्फे प्रजासत्ताक दिनी किसान तिरंगा रॅली

 

जळगाव, प्रतिनिधी  । संविधान बचाव नागरी कृती समिती आणि संयुक्त किसान मोर्चा तसेच विविध सामाजिक संघटना यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन किसान तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवार दि. २६ जानेवारी रोजी सकाळी ठीक ११ वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात होईल . किसान तिरंगा रॅली पं. जवाहरलाल नेहरू पुतळा, टॉवर चौक, चित्रा चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत येईल .त्याठिकाणी देश भक्तीपर गीते सादर केली जातील. प्रमुख मान्यवर रॅलीला संबोधित करणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी ,संविधान प्रेमी स्री- पुरुष बंधू भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा प्रदेश अध्यक्ष मुकुंद सपकाळे,मौलाना आझाद संस्थेचे अध्यक्ष डॉ. करिम सालार, गफ्फार मलिक ,फारूक शेख, सचिन धांडे, प्रा. प्रितीलाल पवार , ईश्वर मोरे, हरिश्चंद्र सोनवणे सर ,छावा मराठा युवा महासंघ जिल्हा अध्यक्ष अमोल कोल्हे, दिलीप सपकाळे, राजू मोरे, श्रीकांत मोरे, मुस्ताक सालार , फईम पटेल , अयाज अली,रमेश सोनवणे,चंदन बिऱ्हाडे,भारत सोनवणे,समाधान सोनवणे, सुनील देहाले,खुशाल सोनवणे,नाना मगरे,गौतम सोनवणे, संजय तांबे, धर्मेश पालखे, आनंदा तायडे, यशवंत घोडेस्वार, गौतम सपकाळे,विजय करंदीकर, विकास मोरे जयपाल धुरंधर यांनी किसान तिरंगा रॅली मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Protected Content