योगेश्वर नगरातून तरूणाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील जुना खेडी रोडवरील योगेश्वर नगरातून तरूणाची दुचाकी चोरून नेल्याची घटना  उघडकीला आली आहे. याबाबत मंगळवारी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शनीपेठ पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, पवन सुभाष काळे (वय-३४) रा. योगेश्वर नगर, जळगाव हा तरूण कुटुंबासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. शनिवारी ९ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता पवन काळे याने त्याच्या मालकीची दुचाकी (एमएच १९ एन ९६४९) त्याच्या घरासमोर पार्कींगला लावलेली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेल्याचे रविवारी १० सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आली. त्याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळाली नाही. अखेर मंगळवारी १२ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्याने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अमोल विसपूते करीत आहे.

Protected Content