अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी मंगळवारी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीत १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्याला आहे. सोमवारी ११ सप्टेंबर रोजी मुलगी ही घरी असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू तिची कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर मंगळवारी १२ सप्टेंबर रोजी सांयकाळी ५ वाजता धाव घेवून पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी करीत आहे.

Protected Content