शेतात सर्पदंश झालेल्या तरूणाचा मृत्यू

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील गोराडखेडा शिवारातील शेतात काम करतांना एकाला सर्पदंश झाल्याने एका २६ वर्षीय तरूणाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी फत्तेपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. विजय अर्जून देवकर वय २६ रा. गोराडखेडा ता. जामनेर असे मयत तरूणाचे नाव आहे.

विजय देवकर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होतो. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. शनिवारी २९ जून रोजी सकाळी ते गोराडखेडा शिवारातील शेतात कामाला गेलेले होते. त्यावेळी त्यांना सर्पदंश झाल्याने त्यांना तातडीने जामनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती त्यांना मयत घोषीत केले. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियांनी आक्रोश केला. याप्रकरणी फत्तेपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राठोड हे करीत आहे.

Protected Content