वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वरणगाव येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. रेल्वे लाईन ओलांडत असताना २२ वर्षीय तरुणीला रेल्वे गाडीने धडक दिल्यामुळे तरूणीचा मृत्यू झाला आहे. ही घटना सकाळी आठ वाजेच्या दरम्यान वरणगाव रेल्वे स्थानकापासून काही अतंरावर घडली असून भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत भुसावळ लोहमार्ग रेल्वे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्वाती भिमराव तायडे (वय २२, रा. तासखेडा ता. रावेर ह.मु. वामन नगर वरणगाव) ही तरुणी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान रेल्वे स्थानकाच्या काही अतरांवर रेल्वेलाईन ओलांडत असतांना नागरपूरकडून येणारी रेल्वे गाडी क्रंमाक ००१४१ने धडक दिली. खांब नंबर ४५६ / २१, १९ जवळ स्वाती तायडे या तरुणीचा जागेच मृत्यू झाला. पुढील तपास भुसावळ लोहमार्ग जे. आर. पी. एफ. पोलिस पी. एस. आय. प्रविण निकाळजे, पो.हे. कॉ. एस. ए. जाधव, किशोर कांडेले करीत आहे.
रेल्वेलाईन ओलांडत असताना रेल्वेने धडक दिल्याने तरूणी ठार
7 months ago
No Comments