वाघुर धरणात बुडून डोहरी येथील १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जामनेर तालुक्यातून दुदैवी बातमी समोर आली आहे. जामनेर तालुक्यातील डोहरी गाव येथील दहावीत शिकणाऱ्या तुषार कमलाकर कोळी (वय १५) या विद्यार्थ्यांचा वाघुर धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना अक्षय तृतीयेच्या संध्याकाळी घडली आहे.
डोहरी गावात राहणारा तुषार कमलाकर कोळी हा विद्यार्थी आपल्या मित्रांसोबत संध्याकाळच्या सुमारास गावाशेजारी असलेल्या वाघूर धरणाजवळ क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. यावेळी क्रिकेट खेळत असताना चेंडू धरणात पडल्यामुळे त्याने चेंडू घेण्यासाठी गेला. धरणाजवळ चेंडू घेत असताना त्यांचा तोल सुटला आणि तो धरणात पडला. मात्र यावेळी अचानक तुषार कोळी हा पाण्यात पडल्यामुळे बुडाला व यावेळी मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर घटना अक्षय तृतीयेच्या पूर्वस्येला घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावासह परिसरात व्यक्त केले जात आहे. कुटुंबात तुषार कोळी हा एकुलता एक होता. त्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Protected Content