भुसावळ शहरात परशुराम जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भव्य शोभायात्रा

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भगवान परशुराम जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहरांमध्ये सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. अष्टभुजा मंदिर येथून भगवान श्री परशुरामाच्या मूर्तीचे पूजन करून शोभा यात्रेला सुरुवात करण्यात आली.
या शोभा यात्रेत पारंपारिक वेशभूषेत महिलांनी लेझीम खेळून जल्लोष साजरा केला. याशिवाय ढोल पथक व ध्वज पथकानेही सर्वांचे लक्ष वेधले. म्युनिसिपल पार्क येथील श्रीराम मंदिरात या शोभा यात्रेची सांगता करण्यात आली असून मोठ्या संख्येने सकल ब्राह्मण समाज बांधव या शोभा यात्रे सहभागी झाले होते.

Protected Content