जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रेल्वेस्टेशन समोरील मोरे वाडा येथून एका तरूणाची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २२ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी बुधवारी २५ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील रेल्वे स्टेशनसमोरील मोरे वाडा परिसरात नयन संजय मोरे हा तरूण वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. २२ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता त्याने त्याची दुचाकी क्रमांक (एमएच १९ ईडी ७३७०) ही पार्कींगला लावलेली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. ही घटना समोर आल्यानंतर तरूणाने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी २५ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल गजानन बडगुजर हे करीत आहे.