जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मेहरूण परिसरातून रावेर तालुक्यातील सावदा येथील तरूणाची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १७ ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रमजान शेर खा तडवी (वय-४०) रा. सावदा ता. रावेर हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. कामाच्या निमित्ताने १६ ऑगस्ट रोजी रमजान हा जळगावातील अक्सा नगरात दुचाकी (एमएच १९ डीआर ०९७०) ने आलेला होता. रात्री ९ वाजता त्याने दुचाकी पार्क करून लावलेली होती. अज्ञात चोरट्याने मध्यरात्री दुचाकी चोरून नेली. हा प्रकार १७ ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता उघडकीला आला. त्याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर बुधवारी २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गणेश शिरसाळे हे करीत आहे.