शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोरून तरूणाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोरून नातेवाईकाला भेटण्यासाठी आलेल्या तरुणाची २५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुरुवार ३ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पेठ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, किशोर रामदास ठाकरे (वय-३६) रा. पारोळा जि. जळगाव हा तरुण आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी बुधवार २ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ७.३० वाजेच्या दरम्यान दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीएल ८९१) ने शहरातील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आला होता.

त्यावेळी किशोर ठाकरे यांनी त्याची दुचाकी हॉस्पिटल समोरील गेट क्रमांक १ समोर पार्किंगला लावली होती. अज्ञात चोरट्यांनी २५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार सायंकाळी घरी जाण्यासाठी निघाले तेव्हा लक्षात आला. किशोरने सर्वत्र परिसरात शोध घेतला, परंतु दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर गुरुवार ३ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक भारती देशमुख करीत आहे.

 

Protected Content