जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील रस्त्यावर जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरूणाला शिवीगाळ करत मारहाण करून जखमी केल्याची घटना रविवारी २९ जून रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली आहे. याप्रकरणी सोमवारी ३० जून रोजी मध्यरात्री १ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, जाकीर अजित पटेलवय ३९ रा. ममुराबाद जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवारी २९ जून रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पानटपरीवरून घरी जात असतांना जुन्या भांडणाच्या कारणावरून मुबारक उर्फ माया हाफीज पटेल, इलियास उर्फ ईल्या रऊफ पटेल, इब्राहिम उर्फ गुड्डू रऊफ पटेल सर्व रा ममुराबाद ता. जळगाव या तीन जणांनी शिवीगाळ करत मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी जाकीर पटेल याने दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रकाश चिंचोरे हे करीत आहे.