धरणगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील चांदसर गावात लघूशंका केल्याच्या कारणावरून एका तरूणाला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवारी १० जून रोजी पहाटे ४ वाजता घडली. याप्रकरणी दुपारी १ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सागर छगन कोळी वय २८ रा. चांदसर ता.धरणगाव हा तरूण वास्तव्याला आहे. सोमवारी १० जून रोजी पहाटे ४ वाजता गावात राहणाऱ्या एका घरात जावून लघूशंका केली. या रागातून गावात राहणारे विशाल अनिल कोळी, सारिका अनिल कोळी, भारती अनिल कोळी आणि अशोक गोपीचंद कोळी सर्व रा. चांदसर ता. धरणगाव यांनी तरूणाला शिवीगाळ करत लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच त्याला जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तरूणाचे वडील छगन रूपचंद कोळी यांनी दुपारी १ वाजता धरणगाव पोलीसात फिर्याद दिली. त्यानुसार मारहाण करणारे विशाल अनिल कोळी, सारिका अनिल कोळी, भारती अनिल कोळी आणि अशोक गोपीचंद कोळी सर्व रा. चांदसर ता. धरणगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ विठ्ठल पाटील हे करीत आहे.