भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाण्याची बाटली घेण्यासाठी गेलेल्या तरूणाला काहीही कारण नसतांना दुकानदाराने शिवीगाळ करून हातातील कैची मारून गळ्याला दुखापत केल्याची घटना बुधवारी ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवारी ५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हरीष सुरेश पवार वय २९ रा. कालंका माता मंदीर, सिंधी कॉलनी, भुसावळ हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बुधवारी ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता हरीष पवार हा भुसावळ शहरातील एसबीआय बँकेजवळील टपरीजवळ पाण्याची बाटली घेण्यासाठी गेला. त्यावेळी काहीही कारण नसतांना दुकानदाराने हरीषला शिवीगाळ करून हातीतील कैची गळ्यावर मारून दुखापत केली आणि धमकी दिली. याप्रकरणी गुरूवार ५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जुबेर तडवी हे करीत आहे.