शिवकॉलनी येथे एकाला लोखंडी रॉडने मारहाण; रामानंदनगर पोलीसात चौघांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । उसनवारीचे पैसे मागीतल्याचे वाईट वाटल्याने चौघांकडून तरूणाला लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केल्याची घटना शिवकॉलनी जवळ घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, राजेश सखाराम पवार (वय-१९) रा. आझाद नगर सबस्टेशन जळगाव यांनी राकेश उर्फ विक्की ज्ञानेश्वर व त्याचा लहान भाऊ (पुर्ण नाव माहिती नाही) दोघांना उसनवारीने पैसे दिले होते. दरम्यान ९ जून रोजी २०२१ रोजी संध्याकाळी शहरातील शिवकॉलनी परिसरात राजेशने राकेशकडे उसनवारीचे पैसे मागितले. याचा राग राकेशला आल्याने त्याच्या भाऊ आणि अन्य दोन अनोळखी असे चौघांनी लोखंडी रॉडने राजेश पवार याच्या पायावर मारहाण करून जखमी केले. राजेश पवार यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनिल पाटील करीत आहे. 

 

Protected Content