मालवाहू गाडी चालविणाऱ्या अल्पवयीन मुलीने दुचाकीला धडक दिल्याने तरूणाचा जागीच मृत्यू

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिरूर येथे मालवाहू पिकअप चालविणाऱ्या पोलीस पाटलाच्या 15 वर्षीय मुलीने दुचाकीला धडक दिल्याने 30 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

शिरुर तालुक्यातील एका अल्पवयीन पोलीस पाटलाच्या 15 वर्षीय मुलीने मालवाहू पिकअप चालविताना दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील 30 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात एवढा गंभीर होता की मालवाहु पिकअपने मोटार दुचाकी चालकास 20 ते 30 फुट फरफटत नेलं. या अपघातात दुचाकी चालक अरुण मेमाणे याचा जागीच मृत्यू झाला तर महिंद्र बांडे हा जखमी झाला आहे.

अरणगावातील पोलीस पाटील संतोष लेंडे यांची अल्पवयीन मुलगी पिकअप क्रमांक एम एच 12 एस एफ 3439 चालवत होती. तिच्या सोबत शेजारील सीटवर पोलीस पाटील संतोष निवृत्ती लेंडे बसले होते. यावेळी मुलगी पिकअप जोरात भरधाव वेगात चालवित होती. यावेळी दुचाकीला समोरुन धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. या प्रकरणी शिक्रापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content