नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नाशिकच्या महसूल आयुक्त पदाचा कार्यभार राधाकृष्ण गमे यांच्याकडून डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्वीकारला. श्री. गमे हे आज सेवानिवृत्त झाल्याने शासनाने गेडाम यांची नियुक्ती केली. डॉ .गेडाम यांनी यापूर्वी नाशिक महापालिका आयुक्त म्हणून काम केलेले असून डॉ. गेडाम सध्या कृषी आयुक्त म्हणून कार्यरत होते.
एक कर्तव्यदक्ष व कडक अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
डॉक्टर गेडाम हे आयुक्त असताना त्यांच्या कारकीर्दीत सिंहस्थ झाला होता त्या काळात त्यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी केली होती. या पार्श्वभूमीवर पुन्हा आगामी होणाऱ्या सिंहस्थ काळात त्यांच्या अनुभवाचा प्रशासनाला फायदा होणार आहे त्याचप्रमाणे जळगाव येथे गाजलेल्या घरकुल घोटाळा सुद्धा त्यांनी उघडकीस आणला होता यामध्ये जळगावचे माजी आमदार व माजी मंत्री सुरेश दादा जैन यांना शिक्षा होऊन कारावास झाला होता त्यामुळे डॉक्टर प्रवीण गेडाम हे राज्यभर चर्चेत होते आता नव्याने त्यांना महसूल आयुक्त पदाची जबाबदारी मिळाली आहे.