मुंबई (वृत्तसंस्था) सुजय विखे पाटील यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्यातील खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपच्या गळाला लागले असल्याचे वृत्त आहे. येत्या एक-दोन दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, रणजितसिंह मोहिते पाटील यांनी काल रात्री उशिरा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही यादीत मोहिते-पाटलांचे नाव नव्हते. त्यामुळे मोहिते पाटील कुटुंबामध्ये अस्वस्थता आहे. म्हणूनच रणजितसिंह मोहिते पाटीलही भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. आगामी एक-दोन दिवसात रणजित सिंह मोहिते पाटील मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. काल रात्री उशिरा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. परंतु या दोघांचीही ही पहिली भेट नव्हती. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या दिवशीही रणजितसिंह मोहिते पाटील गिरीश महाजनांसोबत दिसले होते.त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे. याच निमित्ताने विजयसिंह मोहिते-पाटलांनी आज अकलूजमध्ये महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीला मोहिते पाटील समर्थक या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मोहिते-पाटील या बैठकीनंतर काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे असेल.