रावेर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बुरऱ्हानपुर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील खड्डा चुकवताना एका महिलेचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना रावेर शहराजवळ घडली आहे.
याबाबत वृत्त असे की, बुरऱ्हानपुर-अंकलेश्वर महामार्गा वरुन मोहन सुनिल ठाकरे व त्याची आई आशाबाई सुनिल ठाकरे वय ४५ हे एमएच १९ BW 3727 मोटरसायकलने प्रवास करीत असतांना रावेर शहरा नजिक पंजाब शहाबाबा व मॉर्डन इंग्लिश स्कूल नजिक माहामार्गावर पडलेला खड्डा चुकवत असतांना मोटर सायकलस्वारच्या मागे बसलेल्या त्याच्या आईचा मृत्यु झाला आहे. आई मृत्युला कारणीभुत म्हणून त्याच्या मुलावर गुन्ह्या दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता चंद्रशेख चोपडेकर यांच्या संर्पक करण्याचा प्रर्यन्त केला असता त्यांनी सांगितले. हा महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आता नाही तो राष्ट्रीय महामार्गकडे वर्ग झाला आहे. तरी देखिल रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचा मार्ग लावण्याचा आश्वासन श्री चोपडेकर यांनी दिले.