वडाळा येथे शेताच्या बांधावरून चोरट्यांनी लांबविल्या चार गायी

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील वडाळा शिवारातील शेताच्या बांधावर बांधलेल्या तीन जणांच्या चार गायी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे आज सकाळी उघडकीला आले. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, सुभाष रामदास अहिरराव (वय- ५३ रा. वडाळा ता. चाळीसगाव) येथे पत्नी व तीन मुलांसह वास्तव्यास आहेत. व्यवसाय शेती असल्याने शेतात ५ बैल व २ गायी असे एकूण ७ गुरेढोरे आहेत. १७ एप्रिल रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास सुभाष अहिरराव यांनी गुरांना चारा पाणी करून ते घरी गेले. आज १८ एप्रिल रोजी सकाळी दुध काढण्यासाठी शेताच्या बांधावर गेले असता त्यांच्या मालकीच्या १४ हजार रूपये किंमतीच्या दोन गायी आढळून आल्या नाही. त्यांनी शोधाशोध केली असता त्यांच्या गावातील सतिष सखाराम आमले यांच्यादेखील ८ हजार रूपये किंमतीच्या दोन गायींची चोरी झाल्याचे लक्षात आले. चारही गायींची झाल्याने वडाळा गावात खळबळ उडाली आहे. याबाबत सुभाष अहिरराव यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास गोवर्धन बोरसे हे करीत आहेत.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.