भुसावळ – लाईव्ह ट्रेडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील लक्ष्मी नगरात राहणाऱ्या ३३ वर्षीय महिलेला व तिच्या आईला काहीही कारण नसतांना चार जणांनी मारहाण करून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिवारी दुपारी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, भुसावळ शहरातील लक्ष्मी नगर भागात ३३ वर्षीय महिला ही आपल्या आई सोबत वास्तव्याला आहे. शुक्रवार ५ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता काहीही कारण नसतांना छाया हेंडी, जगदीश हेंडी, नेहा हेंडी आणि बंटी हेंडी सर्व रा. लक्ष्मी नगर, भुसावळ यांनी काहीही करण नसतांना महिलेला मारहाण केली. यावेळी महिलेची आई भांडण सोडविण्यासाठी आल्या असता त्यांना देखील मारहाण केली. यात महिलेचा हात पकडून विनयभंग केला. याप्रकरणी महिलेने चौघांविरोधात पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार शनिवारी ६ एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ तेजस पारीस हे करीत आहे.