घरगुती वादातून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घरातील किरकोळ कारणावरून पोलीस कर्मचारी असलेल्या लहान भावाला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना देशमुख नगरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मोठा भाऊ, त्याच्या पत्नीसह मेव्हणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, “फारूखखॉ चांदखॉ पठाण (वय-३१) रा. नवी मुंबई ह.मु. देशमुख नगर जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मुंबई येथील पोलीस मुख्यालयात पोलीस शिपाई म्हणून नोकरीला आहे. तर मोठा भाऊ शेरखॉ चांदखॉ पठाण हा देखील जळगाव पोलीस मुख्यालयात नेमणुकीस आहे. १४ मे रोजी सकाळी फारूखखॉ पठाण हे त्यांच्या आईच्या नावावर असलेले घर आहे. त्याठिकाणी गेले असता तिथे मोठा भाऊ, त्याची पत्नी फिरदोस बानो, बहिण नफिसा बी पठाण आणि पाहुणे रहिम शेख असे बसलेले असतांना बहिण नफिसाबी याच्या लग्नाचा विषय सुरू होता.

त्यावेळी फारूखखॉ यांनी सांगितले की, तुम्ही बहिणीच्या लग्नाविषयी का सांगत नाही. असे म्हटल्यावर रहिम शेख यांनी मागून पकडून धरले आणि मोठा भाऊ शेरखॉ पठाण याने मारहाण केली तर त्याची पत्नीने शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण केली.”

याप्रकरणी फारूखखॉ चांदखॉ पठाण फिर्यादीवरून मोठा भाऊशेरखॉ चांदखॉ पठाण , त्याची पत्नी फिरदोस बानो, पाहुणे रहिम शेख एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!