शेतात पायी जाणाऱ्या महिलेसह तिच्या सुनेला शिवीगाळ करत काठीने मारहाण

धरणगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील वंजारी शिवारातील शेत गट क्रमांक १६९ मधील शेतातून पायी जात असताना दोन जणांनी काहीही कारण नसतांना महिलेसह तिच्या सुनेला अश्लील शिवीगाळ केली तर सुनेला लाकडी काठीने मारहाण करत हातपाय तोडून टाकण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात धरणगाव पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील वंजारी गावात मंगलाबाई एकनाथ चौधरी या आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. गुरुवार १८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता मंगलाबाई चौधरी या महिला त्यांच्या सून ज्योती प्रमोद चौधरी यांच्यासोबत वंजारी शिवारातील शेत गट क्रमांक १६९ मधून शेतातून पायी जात असताना गुलाब साहेबराव पाटील आणि एकनाथ साहेबराव पाटील या दोघांनी महिलेसह तिच्या सुनेला अश्लिल शिवीगाळ करत हातपाय तोडून टाकण्याची धमकी दिली. तसेच महिलेची सून ज्योती चौधरी हिला काठीने मारहाण करून दुखापत केली आहे. ही घटना घडल्यानंतर मंगलाबाई एकनाथ चौधरी यांनी शुक्रवार १९ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजीव पाटील हे करीत आहे.

Protected Content