जळगाव विमानतळावर जे. पी. नड्डा यांचे स्वागत

 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बुलढाणा जिल्ह्यातील सभेसाठी जळगाव विमानतळावर दाखल झालेले भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे आज विमानतळावर स्वागत करण्यात आले.

आज जे. पी. नड्डा विमानतळावर दाखल होताच त्यांचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह भाजपचे आमदार राजूमामा भोळे, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर, महानगराध्यक्षा उज्वलाताई बेंडाळे, लोकसभा प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, जळगावातील महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content