जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर येथील गर्भवती महिलेला जळगाव शहरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी १८ मे रोजी सिझर करून बाळाला जन्म दिला. मात्र त्याने श्वास घेतला नाही. त्यापाठोपाठ बाळाची आई श्रध्दा जयेश सूतसोनकर वय-२९ रा. पहूर याचा सोमवारी २० मे रोजी सकाळी ८.३० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यावेळी नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आक्रोश केला होता. याबाबत जिल्हापेठ पोलीसात नोंद करण्याचे काम सुरू होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, पहूर येथील राहणाऱ्या श्रध्दा जयेश सूतसोनकर या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला होत्या. श्रध्दा सुतसोनकर या महिला गर्भवती होत्या. त्यामुळे त्यांना जळगाव शहरातील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. महिलेने १८ मे रोजी सीझर करून बाळाला जन्म दिला. नाळ कापल्यानंतर बाळाला ऑक्सीन दिला परंतू त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, बाळाच्या आईची प्रकृती बरी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी बाळावर पहूर येथे विधी करण्यात आला. त्यानंतर २० मे रोजी रात्री २ वाजता महिलेची प्रकृती बिघडली. उपचाराला महिलेकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने तिला इतर ठिकाणी दाखल करण्याचा सत्तला दिली. परंतू सकाळी ८.३० वाजता महिलेचा मृत्यू झाला. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह नेण्यात आला. यावेळी नातेवाईकांनी रूग्णालयात एकच आक्रोश केला होता. महिलेच्या पश्चात ५ वर्षाची मुलगी पती, सासू, सासरे असा परिवार आहे. याबाबत दुपारनंतर जिल्हापेठ पोलीसात नोंद करण्याचे काम सुरू होते.