जामनेरात हॉस्पटलची तोडफोड : मुलाविरूध्द गुन्हा दाखल

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील आर. के. हॉस्पिटल ची तरुणाने कुर्‍हाडीच्या सहाय्याने तोडफोड करत डॉक्टरला जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असून याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, जामनेर शहरातील आर. के. पाटील हॉस्पिटल मध्ये हिवरखेडा येथील अल्पवयीन आरोपीने सकाळी ११ वाजेच्या सुमारास कुर्‍हाड घेऊन अचानक हॉस्पिटलमध्ये आला. त्याने डॉक्टरची विचारपूस केली. मात्र डॉक्टर हे ऑपरेशन थिएटर मध्ये असल्यामुळे आरोपीला दिसले नाहीत. यामुळे त्याने यावेळी डॉक्टर यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर अल्पवयीन आरोपीने त्यांचा हॉस्पिटल मधील दरवाज्यावर व मदत केंद्रावर कुर्‍हाडीने वार केला व या ठिकाणी तोडफोड केली.

संबंधीत घटना ही संपूर्णपणे सीसीटिव्हीत कैद झाली असून याबाबत आर. के. हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर सुषमा रवींद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अल्पवयीन आरोपी यांच्या विरुद्ध जामनेर पोलिसात ४४७, ४२७, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाही मुकेश आमोदकर करीत आहेत.

Protected Content