भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील गुरुद्वारा परिसरात राहणाऱ्या ५५ वर्षीय महिला पहिल्या मजल्यावर कपडे सुकवण्यासाठी दोरी बांधत असताना दोरी अचानक तुटल्याने तोल जाऊन पहिल्या मजल्यावरून खाली पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवार २८ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मनप्रीतकौर अमरजीतसिंग ठेठी (वय-५५, रा. गुरुद्वाराजवळ भुसावळ) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील गुरुद्वारा परिसरात मनप्रीतकौर ठेठी या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला होत्या. बुधवारी २८ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास त्या घराच्या पहिल्या माळ्यावर कपडे सुकवण्यासाठी दोरी बांधत असताना अचानक दोरी तुटल्याने त्यांचा तोल जाऊन ते पहिल्या मजल्यावरून खाली पडल्या. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना तातडीने भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटर येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. याबाबत सायंकाळी ५ वाजता भुसावळ शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेच्या पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड हे करीत आहे.’