बनावट चेक देऊन फसवणूक महिलेची फसवणूक ; आरोपीला अटक

भुसावळ (प्रतिनिधी) इन्शुरन्स क्लेम मंजूर करण्यासाठी पैसे घेऊन बनावट चेक तयार करून महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलीसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

 

फिर्यादी कनिस बी.रज्जाक मणियार (वय ४० मुस्लिम कॉलनी) या महिलेचा पती मयत झाल्याने त्याच्या नावावर असलेले एचडीएफसी लाईफ इन्शुरन्सच्या पॉलिसीचा २९ लाखांचा क्लेम मंजूर करून देण्यासाठी ९ लाख घेऊन प्रत्यक्षात कोणताही क्लेम मंजूर करून न देता फसवणूक केली. तसेच फिर्यादिस २९ लाखांचा बनावट चेक देऊन फसवणूक केली, म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुरुन २२/२०१८ भा.द.वि.कलम ४२०,४६७,४६८,४०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी ३१जुलै २०२० रोजी सिकंदर तडवी ( भुसावळ) आरोपीस अटक करण्यात आली असून चार दिवसांच्या पोलीस कोठडी नंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सदर आरोपीने भुसावळ शहरातील काही लोकांना नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन फसवणूक केली बाबत चौकशी होण्याबाबत विनंती केली आहे.तसेच फसवणूक झालेल्या लोकांनी पोलीस अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा आवाहन करण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि अनिल मोरे व पो.ना. किशोर महाजन करीत आहे.

Protected Content