Home क्राईम पाटणादेवी मंदिराची दानपेटी फोडली : गुन्हा दाखल

पाटणादेवी मंदिराची दानपेटी फोडली : गुन्हा दाखल

0
46


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पाटणादेवी परिसरातल्या चंडीका माता मंदिरातील दानपेटी फोडून यातील रक्कम लंपास करण्यात आल्याची घटना आज उघडकीस आली आहे.

पाटणादेवी येथील मुख्य चंडीका माता मंदिरातील दानपेटी फोडून यातील रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे आज सकाळी उघडकीस आले. तसेच देवीजवळ असलेल्या पत्री दानपेटीला देखील चोरटे घेऊन गेल्याचे दिसून आले आहे. या दानपेटीत सुमारे दीड लाख रूपये असण्याची शक्यता फिर्यादीत नमूद केलेली आहे.

या संदर्भात पुरातत्व खात्याचे कर्मचारी रविकांत उदयराज पाल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चाळीसगाव पोलीस स्थानकात भादंवि कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.


Protected Content

Play sound