भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील छोटा उड्डाणपुलाच्या खाली कापसाने भरलेला ट्रक अडकल्याची घटना रविवारी २८ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे साकेगाव येथील शेतकऱ्यांनी मोठा संताप व्यक्त केला आहे.
भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील राष्ट्रीय मार्गावर छोटा उड्डाणपुल बांधण्यात आलेला आहे. या पुलाची उंची फार कमी असल्याने शेतीचा माल भरून जात असतांना शेतकऱ्यांनी वाहतूकीचा मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान रविवारी २८ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास कापूसाने भरलेला ट्रक हा पुलाखालून जात असतांना या ट्रक अडकला. यावेळी शेतकरी बांधवांनी मोठा संताप व्यक्त केला आहे. महामार्गावरील काम करतांना ठेकेदार आणि इंजिनिअरर्स हे काम केल्यामुळे आज शेतकऱ्यांना मोठा अडचणींचा सामना करावा लागत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे रविंदनाना पाटील यांनी दिली.