उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात होणार तिरंगी लढत होणार; एआयएमआयएच्या उमेदवाराने शेवटच्या दिवशी भरला अर्ज

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघापैकी उत्तर-मध्य मुंबईतून भाजपने खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट करून ज्येष्ठ सरकारी वकील राहिलेले उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे, तर मविआने माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. परंतू आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एआयएमआयएमकडून रमजान चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात मुस्लीमाची संख्या लक्षणीय आहे आणि मुस्लीम उमेदवार येथून निवडणूकीत निर्णायक ठरतो.

उत्तर मध्य मुंबईतील वांद्रे पूर्व, कलिना व कुर्ला मतदारसंघात अल्पसंख्यांक व मुस्लीम समाजाचे मतदान लक्षात घेऊन एमआयएमने उमेदवारी जाहीर केली.महाविकास आघाडीकडून येथील मतदारसंघात मुस्लिम उमेदवार न दिल्याने एआयएमआयएम कडून उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात रमजान चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीने याठिकाणी मुस्लिम उमेदवार द्यायला हवा होता. नसीम खान यांना उमेदवारी न दिल्याने आम्ही एमआयएमकडून मुस्लिम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवत आहोत.

Protected Content