जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद येथील एका फर्निचर दुकानाला शार्टसर्कीटमुळे मध्यरात्री अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत अंदाजे दोन ते अडीच लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. नशिराबाद नगर परिषदेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाल्याने ही आग आटोक्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.
जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे फर्निचरच्या दुकानाला मंगळवारी २ जानेवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली असून शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत सुमारे दोन ते अडीच लाखाचे फर्निचर जळून भस्मसात झाले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी नशिराबाद नगर परिषदेला माहिती दिली मात्र एक तास उलटूनही अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल न झाल्याने आगिने काही वेळात रौद्ररूप धारण केले. तर स्थानिकांनी मिळेल त्या साहित्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. अखेर एक तासाने अग्निशमन दलाचा बंब हा घटनास्थळी दाखल झाला असून अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान स्थानिकांनी नगरपरिषदेच्या गलथान कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.