….आणि जखमी चालकासह बस थेट सिव्हील हॉस्पीटलमध्ये !

जळगाव प्रतिनिधी । टायर फुटल्यामुळे झालेल्या अपघातात जखमी झालेल्या बस चालकाला दुसर्‍या चालकाने थेट सिव्हीलमध्ये बस दाखल केल्याची घटना आज घडली. आपल्या सहकार्‍याच्या मदतीला धावलेल्या या एसटी चालकाचे कौतुक होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रावेर डेपोची औरंगादबाद-रावेर बस औरंगाबाद येथून जळगाव कडे सकाळी ८ वाजता रवाना झाली. त्यावर शेख मोहसीन शेख आरीफ (वय-३५) रा. फैजपूर ता. यावल हे चालक म्हणून बस चालवत होते. सिल्लोड बसस्थानकातून बस निघाल्यानंतर बस रस्त्यावरून जात असतांना बसचे पुढचे टायर फुटल्याने चालक शेख यांचा बसवरील ताबा सुटला. त्यात समोरून भरधाव वेगाने येणार्‍या बसला धडक दिली. यात अपघातात कोणत्याही प्रवश्याला दुखपत झाली नाही. परंतू बसचालक शेख मोहसीन यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.  त्यांची ही स्थिती येथून जाणार्‍या एस.एस. परदेशी या सिल्लोड आगाराच्या चालकाला समजली. परदेशी यांनी तातडीने शेख यांच्यावर नजीकच्या रूग्णालयात प्राथमोचार केले. नंतर त्यांना महामंडळाच्या बसमधून थेट जळगाव जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. दरम्यान जिल्हा रूग्णालयाच्या आवारात पहिल्यांदा बस आल्याने अनेकांची तारांबळ उडाली होती. जखमी चालकाचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आलेे.

एसटी बस चालक अनेक प्रकारच्या अडचणी व तणावांवर मात करून आपले कर्तव्य बजावत असतात. अशा वेळेस लहानमोठे अपघातही होत असतात. या प्रसंगात एकमेकांना मदत करण्याची वृत्ती दिसून येते. याच प्रकारे संबंधीत एस.एस. परदेशी यांनी आपल्या सहकार्‍याला केलेली मदत ही कौतुकाचा विषय बनली आहे.

Protected Content