जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील चिंचोली गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या कारने प्रवाशी बसला जोरदार धडक दिल्याची घटना दुपारी घडली. या धडकेत दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, “जळगाव आगारातून बस क्रमांक (एमएच २० बीएल ३५९०) ही जळगावहून पैठणला जाण्यासाठी दुपारी निघाली. तालुक्यातील चिंचोली गावाजवळून दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास बस प्रवाशी घेवून जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणारी कार क्रमांक (एमएच ०५ बीएल ००२५) ने जोरदार धडक दिली.
या धडकेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात सुदैवाने दोन्ही वाहनातील कुणालाही दुखापत झालेली नाही. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात बस चालक मच्छिंद्र दिनकर सांगळे रा. माळेगाव ता. शिरूर जि. बिड यांनी धाव घेतली. याबाबत अज्ञात कार चालकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.