नागपूरात ३ लाखाची लाच घेताना बडा अधिकारी एसीबीच्या जाळयात

नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नागपूरमध्ये बडा अधिकारी जाळ्यात अडकवण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश आले आहे. नागपूरमधील राज्य उत्पादन शुल्क विभागाचा निरीक्षक रवींद्र लक्ष्मण कोकरे ई- विभाग यास ३ लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी अटक केली.
तक्रारदाराचे नवीन एफएल-३ परवान्याचे व्हेरिफिकशन करून अधीक्षकांकडे फाईल पाठवण्यासाठी कोकरे याने ४ लाख रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडीअंती ३ लाख २५ हजार रुपये देण्याचे ठरले. गुरुवारी ही रक्कम स्वीकारत असताना कोकरे यास पथकाने अटक केली.

Protected Content