नागपुरातील 200 वर्षांपासूनची वेश्यावस्ती बंद

 

नागपूर : वृत्तसंस्था ।  शहरातील 200 वर्षांपासून असलेली वेश्यावस्ती बंद करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांनी गंगाजमुना परिसरातील या गल्ल्या सील केल्या आहेत.

 

या वस्तीत अवैध धंदे आणि कोरोना नियमांचं पालन होत नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मात्र, या कारवाईनंतर येथे राहणाऱ्या महिला आक्रमक झाल्या असून आम्ही कसं जगायचं ? असा सवाल त्यांनी केला आहे. वस्ती पुन्हा सुरु केली नाही तर आम्ही रस्त्यावर येऊ असा इशारादेखील या महिलांनी दिला आहे.

 

नागपुरातील गंगाजमुना परिसरात जवळपास दोनशे वर्षांपासून सुरु असलेली वेश्यावस्ती आहे. या वेश्यावस्तीत अनेक महिला राहतात. त्यांच्या चरितार्थ त्या कसाबसा भागवतात. मात्र, काही नागरिकांनी या वस्तीत अवैध धंदे होत असल्याचा आरोप केला आहे. तसेच या ठिकाणी कोरोना नियमांचं पालन होत नसल्याची तक्रारसुद्धा नागरिकांनी केली होती. त्यानंतर या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी हा परिसर सील केला. पोलिसांच्या या कारवाईनंतर आता येथील महिला आक्रमक झाल्या आहेत.

इथल्या वारांगणांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केलाय. आता आमच्याशी लग्न कोण करणार? आम्ही जायचं कुठे ? जगायचं कसं ? 200 वर्षांपासून हा परिसर सुरु आहे, आत्ताच का बंद केला? असा सवाल उपस्थित त्यांनी केलाय. ज्येष्ठ विदर्भवादी नेते जांबुवंतराव  धोटे यांनी गंगाजमूना येथील वारांगणांना बहीण माणलं होतं. आता त्यांच्या पश्चात  धोटे यांची मुलगी ज्वाला धोटे यांनी आज वारंगणांची भेट घेतली.

 

ज्वाला धोटे यांनी येत्या 15 ॲागस्टपर्यंत गंगाजमूना येथील बॅरीकेट्स हटवले नाही, तर रस्त्यावर उतरू असा इशारा दिला आहे. नागपूर प्रशासन आगामी काळात यावर काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Protected Content