मोठी बातमी ! राज ठाकरे-नरेंद्र मोदी पहिल्यांदाच एकाच मंचावर येणार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा एकाच मंचावर येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यामध्ये मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी १७ मे रोजी मुंबईतील शिवाजी पार्कवर भव्य सभा पार पडणार आहे. ही महायुतीची मुंबईत निवडणूकीसंदर्भात शेवटची सभा असेल. यासाठी मोदींचा मुंबईत रोड शो देखील होईल. नरेंद्र मोदी करिता राज ठाकरे महायुतीत सामील झाले आहेत. त्यामुळे ते भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा देखील घेत आहे.
राज ठाकरे यांनी भाजप उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सभा ही घेतली होती. आता १० मे रोजी पुण्यात आणि १२ मे रोजी ठाणे जिल्ह्यात राज ठाकरे यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर ते १७ मे रोजी पंतप्रधान मोदी सोबत १७ मे रोजी संध्याकाळी शिवाजी पार्कमध्ये सभा घेणार आहे. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहे. ही माहिती मनसेचे सरचिटणीस वागीश सारस्वत यांनी दिली आहे.

Protected Content