मोठी बातमी ! खा. इम्तियाज जलील यांनी घेतली शांतीगिरी महाराजांची भेट

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एआयएमआयएचे प्रमुख नेते आणि छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांची भेट घेतली आहे. जय बाबाजी भक्तपरिवाराच्या पाठिंब्यासाठी जलील यांनी महाराजांची भेट घेतली आहे. याआधी त्यांची भेट महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी घेतली आहे. २००९ साली शांतिगिरी महाराज यांनी संभाजीनगरमध्ये निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना दीड लाख मते मिळाली होती. बाबाजी भक्तपरिवाराच्या पाठिंब्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या उमेदवारांनी वेरुळात शांतीगिरी महाराजांची भेटी घेतली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा लोकसभा उमेदवार संदिपान भुमरे, विद्यमान खासदार इम्तियाज जलील, अपक्ष उमेदवार डॉ. जीवन राजपूत, अपक्ष उमेदवार जेके जाधव, अपक्ष उमेदवार संजय भास्कर शिरसाट आणि शिर्डी मतदार संघातील अपक्ष उमेदवार भारत संभाजी भोसले या सर्वांनी शांतिगिरी महाराजांचा आशिर्वाद घेतला. छत्रपती संभाजीनगरमधून शांतिगिरी महाराजांचा पाठिंबा कुणाला याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शांतिगिरी महाराज अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर १० तारखेला जाहीर करण्यात येणार आहे. अशी माहिती जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने राजकीय समितीचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी दिली

Protected Content