कुसुंबा येथील वृध्दाचे बंद घरातून सोन्याच्या दागिन्यांची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील वृध्द व्यक्तीचे बंद घर फोडून १ लाख ३० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना ५ मे रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी मंगळवारी ७ मे रोजी सकाळी १०.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात नामदेव पंडीत पाटील वय ६४ रा. कुसुंबा ता.जि.जळगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. कंपनीत सेक्यूरीटी गार्ड म्हणून ते कामाला आहे. ४ मे रोजी रात्री ९ वाजता ते कामावर निघून गेले. त्यावेळी त्यांनी घर बंद केले होते. अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याचा फायदा घेत घरफोडी करून घरातील १ लाख ३० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. दुसऱ्या दिवशी रविवारी ५ मे रोजी सकाळी ७ वाजता नामदेव पाटील हे घरी आले. त्यावेळी घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. अखेर त्यांनी मंगळवारी ७ मे रोजी सकाळी १०.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे हे करीत आहे.

Protected Content