जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसीतील जी सेक्टरमधील एका कंपनीच्या गेटच्या बाहेर जावू दिले नाही म्हणून सुरक्षारक्षकाच्या गळ्यावर ब्लेडने वार करून जखमी केल्याची घडना घडली आहे. याप्रकरणी बुधवार २८ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन वसंतराव जोशी (वय-५५) रा. अयोध्या नगर, जळगाव हे एमआयडीसीतील जी सेक्टरमधील गुणीना कर्मशिअल कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून नोकरीला आहे. बुधवार २८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारा कंपनीत काम करणारा आकाश समाधान पाटील रा. पिंप्राळा जळगाव हा कंपनीच्या गेटजवळ आला. त्यावेळी गेटच्या बाहेर जात असतांना सुरक्षारक्षक यांनी पास मागितली. याचा राग आल्याने आकाश पाटील याने हातातील ब्लेडने सुरक्षारक्षक नितीन जोशी यांच्या गळ्यावर वार करून जखमी केले व मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रात्री १० वाजता नितीन जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी आकाश पाटील याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील करीत आहे.