दिव्यांगांना विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी मिळणार विशेष सवलत

vidyapith news

जळगाव प्रतिनिधी । उच्च शिक्षणात दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा देण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने पुढाकार घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून विद्यापीठ व मुंबई येथील टाटा इन्स्टिटयुट ऑफ सोशल सायन्सेस यांच्यात शुक्रवारी सामंजस्य करार करण्यात आला.

महाराष्ट्र शासनाने दिव्यांग विद्यार्थ्यांना कॉमन रुम, उपहारगृह, सभागृह, रँम्प्‍, ग्रंथालय, पुस्तके, शौचालय आदी सोयी-सुविधा देण्याबाबत दिव्यांग व्यक्तिंचे अधिकार, कायदा-२०१६ ची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यापीठाने याबाबत यापूर्वीच पुढाकार घेऊन कॅम्प्ंसवर सोयी-सुविधा पुरविण्याबाबत काम सुरू केले आहे. शुक्रवारी मुंबई येथील टाटा इन्स्टिटयुट ऑफ सोशल सायन्सेसच्या समन्वयक डॉ. वैशाली कोल्हे व कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांची विद्यापीठात बैठक होऊन विद्यापीठ व महाविद्यालयात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उपलब्घ करुन देण्यात येणाऱ्या विषयावर सविस्तपणे चर्चा झाली. दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करणे, शैक्षणिक उपक्रम राबविणे या विद्यार्थ्यांसाठी परिषद व कार्यशाळा यांचे आयोजन करणे, छोटे छोटे अभ्यासक्रम तयार करणे आदी बाबत सविस्तर चर्चा झाली. टाटा इन्स्टिटयुट ऑफ सोशल सायन्सेस व विद्यापीठ यांच्यात कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सामंजस्य्‍ करार करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
यावेळी डॉ.वैशाली कोल्हे, प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहूलीकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक बी.पी.पाटील, प्रभारी वित्त व लेखाधिकारी सोमनाथ गोहिल, प्रभारी कार्यकारी अभियंता एस.आर.पाटील, विद्यार्थी विकास विभाग संचालक प्रा.सत्यजित साळवे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.पंकज नन्न्वरे, विद्यापीठ उप अभियंता आर.आय.पाटील, कनिष्ठ अभियंता विनय देसले, सहायक कुलसचिव रामनाथ उगले, एन.जी.पाटील, नवजित उपस्थित होते. या करारान्वये विद्यापीठ व परिक्षेत्रात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सोयी-सुविधांसाठी टाटा इन्स्टिटयुट ऑफ सोशल सायन्सेसकडून विद्यापीठाला सहकार्य मिळणार आहे.

Protected Content