सोमवारी विदर्भांतील ब्रम्हपुरीत ४७.१ अंश सेल्सिअस तापमानाची रेकार्ड नोंद

नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सध्या राज्यातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा परिणाम पाहायला मिळत आहे. विदर्भातही हिटवेव्हचा परिणाम सर्वत्र जाणवत आहे. विदर्भातील अनेक शहरांमध्ये पारा वाढल्याचं दिसून आलं. सोमवारी विदर्भातील ब्रम्हपुरी शहरात पाऱ्याने तब्बल 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली आहे. हा गेल्या काही दिवसातील सर्वाधिक आकडा असल्याचं सांगितले जात आहे.

त्यामुळे नागपुरात सोमवार हा दशकातील सर्वात उष्ण दिवस ठरला आहे. नागपूरचे कमाल तापमान एकदम 3.2 अंश सेल्सिअसने वाढून 45.6 वर पोहोचले आहे. यापूर्वी 19 में 2017 रोजी तापमानाने 45.5 आकडा गाठला होता. गेल्या दहा वर्षांत पाच वेळा नागपूरचे कमाल तापमान 45 डिग्री किंवा त्यापेक्षा अधिक नोंदविण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या दुसऱ्या राजधानीतील सर्वकालीन सर्वाधिक उष्ण दिवसाबद्दल सांगायचे तर 11 वर्षांपूर्वी सर्वाधिक उष्ण दिवसाची नोंद झाली होती. नागपूर शहरातील सर्वाधिक कमाल तापमान 2013 वर्षी 23 मे रोजी 47.9 डिग्री नोंदविण्यात आले होते. विदर्भा पुरते सांगायचे तर अमरावती आणि वर्धा या शहरांमध्ये कमाल तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत राहिले.

दरम्यान तीन दिवसांनंतर ढगाळ वातावरणामुळे विदर्भातील नागरिकांना उष्णतेच्या लाटेपासून सुटका मिळेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. मान्सूनबद्दल सांगायचं झालं तर केरळमध्ये मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती तयार होण्याचे संकेत आहेत. येत्या पाच दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होणार असून राज्यात दहा जून रोजी सर्वप्रथम मुंबईत दाखल होईल. या दरम्यान विदर्भात आणि अन्यत्र काही ठिकाणी मॉन्सून पूर्व सरी कोसळण्याची शक्यता आहे. यावर्षी देशात सरासरी पेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Protected Content